

अंबाजोगाई शहरात सध्या सुरु असलेल्या नगर परिषद निवडणुकीत राजकिशोर मोदी व नंदकिशोर मुंदडा हे नगरध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवीत आहे तसेच दोघाच्याही दोनवेगवेगळ्या आघाड्या मार्फत प्रत्येक प्रभागात त्यांचे उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे आहेत बहुतेक प्रभागात ऐकाचजातीचे उमेदवार आमने सामने निवडणूक रींगणात आल्याने शहरात प्रचंड तनाव जन्य परस्थिती निर्माण झाली आहे. सध्या निर्माण झालेली परस्थिती पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीने हाताळते याकडे शहर वासियांचे लक्ष लागले असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे
