

अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकी मध्ये प्रभाग क्र 11 ते 15 मध्ये मोठया प्रमानात क्रॉस मतदान झाल्याची चर्चा काल पासून होत आहे प्रभाग क्र 11 ते 15 मध्ये एक नगरध्यक्ष व सर्व ऐकूण 11 नगरसेवक पदा साठी मतदान झाले. या पाच प्रभागमध्ये 22192 ऐकून मतदान होते त्यापैकी 15292 मतदारांनी आपला मतदा्नाचा हक्क बजावला आहे प्रभाग 11 ते 15 मध्ये पॅनल टू पॅनल मतदान झाले नसल्याने कोणत्याही प्रभागात दोन नगरसेवक व एक नगरध्यक्ष एकाच पॅनल चे निवडून येणे कठीण दिसत आहे काही मतदारांनी नगरध्यक्ष पदाचे मतदान क्रॉस केले तर अनेकांनी नगरसेवक पदाचे मतदान क्रॉस केलेले आहेत त्यातच दोन मते एका पॅनल ला तर एक मत विरोधी पॅनल झाल्यामुळे व या पाच प्रभागात 25 टक्के मतदार असुशक्षित असल्यामुळे त्यांनी मतदान क्रॉस करताना याचे मत त्याला त्याचे मत याला दिल्याने काटेकी टक्कर असलेल्या ठिकाणचे निकाल पालटू शकतो येथील फक्त प्रभाग क्र 12 मध्ये लोकविकास आघाडी च्या दोनीही जागा विजय होताना दिसत आहे मात्र नगरध्यक्ष पदाचे मतदान याठिकाणी देखील क्रॉस झाले असल्यामुळे याचे मत त्याला त्याचे मत याला झाले तर येथे देखील विचित्र निकाल लागेल म्हणून प्रभाग क्र 11 ते 15 या प्रभागात कोणत्याही एका पॅनल दोनीही उमेदवार निवडून येणे कठीण दिसत आहे तसेच नगरध्यक्ष पदा साठी कोणाला आघाडी मिळेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे उर्वरित प्रभाग क्र 1 ते 10 मध्ये मुस्लिम समाजतील कुरेशी, बागवान, जरगर, या जातीचे जास्त प्रमाणता मतदान मुंदडा गटा कडे गेल्याचे दिसून आले असले तरी
प्रभाग क्र 3,4,9 मधून मोदींना मोठी आघाडी मिळताना दिसत आहे त्यामुळे प्रभाग क्र 1 ते 10 मध्ये मोदींना थोडी फार का होत नाही पण आघाडी मिळेल असे सध्या तरी दिसत आहे….
