अंबाजोगाई येथील पोखरी रोडवर दुचाकी आडवी लाऊन रस्त्यावर जा ये करणारे व दुचाकीस्वारांना आपली दुचाकी आडवी लाऊन त्यांचे मोबाईल हिसकावून पळ काढणारे दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेली माहिती अशी की यातील आरोपी हा त्याच्या अंबाजोगाई येथील घरासमोर उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली असताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो संघर्षविधी बालक असल्याचे समजले असता त्याच्या जवळ असलेली दुचाकी व मोबाईल बद्दल विचार पूस केली असता सदरील दुचाकी व मोबाईल अंबाजोगाई येथे चोरलेले असल्याचे त्याने सांगितले त्याच्या जोडीदारा बाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की रितेश चव्हाण याने मिळून येथील गुन्हे केले आहे रितेश चव्हाण हा सध्या सांगली जिल्ह्यात खुनाच्या गुन्ह्यात अटक असल्याचे त्याने सांगितले सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बन्टेवाड, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शना खाली मारोती कांबळे, रामचंद्र केकाण यांनी केली आहे
