****************************************
नेकनूर
नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालय उर्दू माध्यमासाठी दोन महिन्यापासून एक ही प्राध्यापक नसल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनीचे शिक्षणाचे नुकसान होत होते व शासकीय अध्यापक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर होते परंतु नेकनूर येथील सय्यद शोहेब आमदार भारतीय जनता पार्टी बीड जिल्हा अल्पसंख्यांक सरचिटणीस यांनी विभागीय उप शिक्षण संचालक छत्रपती संभाजीनगर यांना दिनांक 8 डिसेंबर,2025 रोजी निवेदन देऊन शोहेब आमदार यांनी शेख रईस रेफ्रिजेशन मालक, शेख रऊफ उद्योजक, वहिद सर सचिव उर्दू मोईन नझीरोदिनसर उर्दू टीचर प्रदेशाध्यक्ष टीचर असोसिएशन छत्रपती संभाजी नगर, शेख अनवर जागीरदार उद्योजक, सय्यद इलियास अब्बास साहब छत्रपती संभाजी नगर, यांना घेऊन
नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले असत ना. पंकजताई मुंडे यांनी तात्काळ लक्ष घालून विभागीय शिक्षण उपसंचालक श्री कैलास दातखिड छत्रपती संभाजी नगर यांना तात्काळ आदेश देऊन चार प्राध्यापक नेकनूर येथील अध्यापक महा विघ्यालयात नेमण्याचे सांगितले. त्याची अमलबजावणी करत विभागीय उपसंचालक यांनी शिक्षण अधिकारी बीड यांना लेखी आदेश देत नेकनूर येथील अद्यापक महा विद्याल्यात चार प्राध्यापक यांची नेमणूक करण्यास सांगितले.
नेकनूर करांच्या वतीने नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचे शोएब आमदार व त्यांचे सहकार्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे
