
बीड दि. 12 – राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या MSME क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृद्धीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालया मार्फत राज्यात राबवत आहेत.
सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026 या अंतर्गत बीड जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.13.01.2026 रोजी हॉटेल अन्विता, जालना रोड, बीड येथे सकाळी 10.00 ते 04.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे, तरी सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांनी केले आहे.
