
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांचा संयुक्त उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने तालुकास्तरीय वैयक्तिक व समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे अध्यक्ष भिमाशंकर शिंदे व सचिव सुनील व्यवहारे यांनी केले आहे.
रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांच्या वतीने नृत्य क्षेत्रात शहरातील नव्या प्रतिभांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध व्हावे या विधायक उद्देशाने आज रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी मनोहर अंबाजोगाई महोत्सव – २०२६ आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने तालुकास्तरीय वैयक्तिक व समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धा आज रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी वेळ – सकाळी १० वाजता तर तालुकास्तरीय समूहनृत्य स्पर्धा वेळ – दुपारी ३ वाजता, दोन्हीही स्पर्धा आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा लहान गट इयत्ता १ ली ते ४ थी, मोठा गट इयत्ता ५ वी ते १० वी, खुला गट इयत्ता ११ वी पासून पुढील मुली व महिलांसाठी आणि दिव्यांग गट – शारीरिक अपंगत्व प्रवर्गातील सर्व विद्यार्थी या गटात होणार आहेत. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय या प्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत लहान, मोठा, खुला, दिव्यांग गटाचा समावेश आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रो.भिमाशंकर शिंदे (मोबाईल नंबर – ९७६५१४४८७३), रो.सुनील व्यवहारे (मोबाईल नंबर – ९३२५७६२८१७), प्रा.अनंत कांबळे (मोबाईल नंबर – ८६००१३४००७) आणि गणेश तौर (मोबाईल नंबर – ९४२३८८६५२८), प्रा.सौ.आरती भिमाशंकर शिंदे (लिंबगावकर), सुशील कुंबेफळकर, विक्रमसेन आगळे, गोविंद जगधने, बालासाहेब वरने, बळीराम उपाडे, सत्यम जोगदंड यांच्यासह रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई व नवकेशर डान्स ऍण्ड ड्रामा अकॅडमी यांनी पुढाकार घेतला आहे.
=======================
