news-25 caption
नगरपालिका निवडणूक 2024 कार्यक्रममाध्यम प्रनिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास माध्यम प्रवेशिकेसाठी अर्ज करावा बीड, दि.26 (जिमाका): – नगरपालिका निवडणूक 2025 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, माजलगाव आणि किल्ले-धारूर या 6 नगरपालिकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. याचे वृत्तसंकलन करण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी या नगरपालिकांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. माध्यम प्रतिनिधींनी आपल्या संपादकांच्या शिफारस पत्रासह 3 छायाचित्रे तसेच आधार क्रमांकाच्या पुराव्यासह संबंधित कार्यालयांकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा माध्यम संनियंत्रण व माध्यम प्रमाणन (MCMC) समितीने केले आहे.याबाबत निवडणूक मार्गदर्शक तरतुदीत असलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हे आदेश जारी केले आहेत. यानुसार बीड सह उर्वरित 5 नगरपरिषदांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रवेशिका जारी करणारे प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे.माध्यम प्रतिनिधींना सूचना• कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रात प्रवेशिकेशिवाय प्रवेश करता येणार नाही. • विहित पद्धतीनुसार माध्यम प्रतिनिधींना संपादकांच्या शिफारस पत्रासह ताज्या 3 छायाचित्रांसह आणि ओळख पटवण्यासाठी आधार ची झेरॉक्स किंवा वृत्तपत्राने दिलेले ओळखपत्र यांची झेरॉक्स अर्जासह जोडावी. • राज्य शासनाच्या यादीवरील वृत्तपत्रांसाठी दैनिकाचे संपादक व प्रतिनिधी (अधिकाधिक 2 जणांना) प्रवेशिका दिला जातील. • उपग्रह वाहिन्या तसेच टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल साठी 1 प्रतिनिधी व 1 कॅमेरामन याप्रमाणे 2 प्रवेशिका मिळू शकतील. वर नमूद व्यतिरिक्त (उदा. युट्यूब चॅनेल, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मिडिया हॅन्डल) कुठल्याही प्रतिनिधीला किंवा कॅमेरामनला प्रवेशिका देण्यात येणार नाही. • प्रवेशिका संख्या कमी करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधि
कारी (प्राधिकारी) यांना असेल.
