मनसूर हायस्कूल अंबाजोगाई या शाळेने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 95.78 टक्के निकालाची भव्य कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे सेमी इंग्लिश विभागाचा निकाल 100 टक्के लागल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले असून 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 21 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 13 विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत यश मिळवले आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सय्यद मेराज सर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. एम. खान साहेब तसेच सचिव लतीफ खान साहेब यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या या उज्ज्वल निकालामुळे अंबेजोगाई परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मनसूर हायस्कूल, अंबेजोगाईचा एस.एस.सी. निकालात दिमाखदार यश