दिव्यांग कल्याण विभाग मुबंई मार्फत जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना आपले UDID कार्ड तपासणी अंतर्गत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्या अंतर्गत दि 8 आक्टोबर 2025 रोजी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आज निलंबीत करण्यात आलेले कर्मचारी उपस्थित होते त्यावेळी सर्वांना आपले UDID कार्ड वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र सूचना देऊन सुद्धा त्या कर्मचाऱ्यांनी आपले वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांना दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 प्रमाणे निलंबीत करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी काढले आहे….



