डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे हे गावातीलच दुसऱ्याची शेती बटाई ne करतात त्यांनी जोडव्यवसास म्हणून शेतात शेड करून शेळी पालन केले होते. काल संध्याकाळी त्यांनी आपल्या शेळ्या शेड मध्ये टाकून घरी गेले व आज सकाळी शेळ्या सोडण्यासाठी ते शेतात गेले असता आपल्या शेळ्या जंगली प्राण्यांने मारल्याच्या दिसल्या याबाबत ची माहिती त्यांनी तहसीलदार यांना दिली तात्काळ तलाठी मंडळ निरीक्षक यांनी जाऊन पाहणी करून वनविभाग व पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून पंचनामा व श्ववीछेदन करण्यास सांगितले असता सदरील शेळ्या सहा फूट उंचीचे कम्पउंड च्या आत जाऊन जंगली प्राण्यांने मारल्याचे समजले असता शेतकरी बळीराम केंद्रे यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली असून शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे…..





