बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार येथे डॉक्टरांना नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात एका मुस्लिम समाजाच्या महिला डॉक्टर यांचा हिजाब स्वतःच्या हाताने खाली ओडून अवमान केल्याने आज अंबाजोगाई शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नितीश कुमार यांचा निषेध करत त्यांच्यावर सुमोटो अंतर्गत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे करण्यात. आली यावेळी माहरुफ साहब, ऍड इस्माईल गवळी, शेहबाज मणियार यांच्या सह मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
