#मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे…#
#प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे#


जमात ए इस्लामी हिंद व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज पवित्र रमजान महिन्या निमित्त रोजा इफ्तार मस्जिद परिचय व स्नेह मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गजलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे तर उदगीर येथील सुप्रसिद्ध इस्लामिक मराठी वक्ते मुजीब देवणीकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी करताना हिंदू मुस्लिम ऐक्य परस्पर धार्मिक सहिष्णुता यांची जपणूक करून इस्लाम धर्माविषयी मस्जिद विषयी असणारे समज गैरसमज त्याचबरोबर सखोल ज्ञान प्राप्त होऊन धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असे सांगितले.
व्याख्याना मध्ये मुजीब देवनीकर यांनी पवित्र कुराण मधील महत्त्वाची तत्वे,त्याच बरोबर इस्लाम धर्माची शिकवण, रोजा म्हणजे नुसता उपवास नाही तर त्याबरोबर पाळावयाची काही महत्त्वाची तत्त्वे याविषयी सविस्तर माहिती देऊन पवित्र कुराण या ग्रंथाविषयी सविस्तर माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ मुकुंद राजपंखे यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..या साने गुरुजी च्या प्रार्थनेचा धागा पकडत सर्वश्रेष्ठ धर्म हा मानवता आहे सर्वश्रेष्ठ नातं हे मैत्री आहे,एखाद्या रडणाऱ्या बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे,एखाद्या दुःखी माणसाच्या चेहऱ्यावर सुखाची किनार उमटविणे म्हणजे सुद्धा नमाज आहे, त्यासाठी सर्वांनी माणसाने माणसा सोबत माणसा सारखे वागावे असे आवाहन केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे सचिव श्री विष्णू सरवदे यांनी केले.
यावेळी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे पांडुरंग नरवडे साधू गायकवाड उमेश नाईक शेख आरिफ बाळासाहेब माने संदीप दरवेशवार तसेच जमात जमात ए इस्लामी हिंदचे फसी हाशमी शेख मुनीर शेख हाफिज शेख मकसूद शेख नईम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी परिश्रम घेतले.
