
आंबाजोगाई(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या माला करीता योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे.परंतु आपल्या कडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले जाते.त्या मुळे बरेच शेतकरी हवालदिल होतात. आत्महत्या करतात. आपलं आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे.
आपली हरितक्रांती लंगडी आहे.हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही.जो पर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार नाही तो पर्यंत आपला देश प्रगत झाला आहे असे म्हणणे योग्य नाही असे मार्गदर्शन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.ते 27 नोव्हेंबर रोजी यशवंतराव स्मृती समारोहा निमित्त आयोजित शेतकरी परिषदेत ‘यशवंतराव चव्हाण याचें कृषी-औद्योगिक धोरण आणि वर्तमान’ या विषयावर बोलत होते.
या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील प्रयोगशील महिला शेतकरी कृषिभूषण विजया गंगाधर घुले या होत्या.
या परिषदेचे प्रास्ताविक यशवंतराव स्मृती समारोहाचे उपाध्यक्ष आंबाजोगाई येथील प्रगतशील शेतकरी सतीशनाना लोमटे यांनी केले.ते म्हणाले की शेती करतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या व तसेच त्यांच्या कडून शेती उत्पन्नासाठी केले जाणारे नवनवीन प्रयोग या संदर्भात सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी व तसेच कृषी क्षेत्रातील होणाऱ्या विध्यापिठीय संशोधनाची नवनवीन प्रजातींची माहिती सर्वांना व्हावी म्हणून गेल्या 41 वर्षांपासून यशवंतराव स्मृती समारोहाच्या माध्यमातून ही शेतकरी परिषद घेतली जात आहे.
डॉ.अशोक ढवण पुढे म्हणाले की यशवंतराव चव्हाण यांचे कृषी – औद्योगिक धोरण या विषयावर बोलताना म्हणाले की.यशवंतरावाणी गावांच्या विकासासाठी पंचायत राज्याची स्थापना केली.दुधसंघ,सहकारी कारखान्याची उभारणी केली.महाराष्ट्राच्या विकासासाठी मराठी राज्य एकसंघ राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न केले.महाराष्ट्राच्या आर्थिक,औद्योगिक व सांस्कृतिक प्रगतीच्या शिल्पा विषयी त्यानी सतत मार्गदर्शन केले.म्हणून त्याना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतात. महाराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक व शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे.असे ही डॉ. ढवण म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात प्रयोशील महिला शेतकरी कृषिभूषण विजया घुले यांच्या वतीने त्यांचे पुत्र दत्ताजी घुले यांनी ते करीत असलेल्या शेतीच्या प्रयोगाविषयी मार्गदर्शन केले.त्यानी कमीत कमी खर्चात केलेल्या ड्रॅगन फ्रुट व खजूर या मिश्र पिकांच्या यशस्वी लागवडी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की शेतीत नवनवीन प्रयोग होणे काळाची गरज आहे.तरच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होऊ शकते.
कार्यक्रमाचे संचलन बी.के.ढगे यांनी केले.उपस्थितीतांचे आभार शेख के.डब्लू. शेख यांनी मांनले.
परिषदेचा शेवट स्नेहभोजनाने झाला. परिषदेला नागरिक व परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थिती होते.
